ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचे चटके

Foto

जिल्ह्यात टँकरची संख्या ९०; मराठवाड्यात १८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ऐन
पावसाळ्यात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहे. पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात शून्यावर आलेली टँकरसंख्या ९० पर्यंत पोहोचली आहे. तर मराठवाड्यात हाच आकडा १८१ पर्यंत वाढला आहे.
जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. परिणामी संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील टँकरसंख्येत मोठी घट झाली. पाण्याची चिंतादेखील काही प्रमाणात मिटली होती. परंतू त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने २७ जुलैच्या अहवालानुसार संभाजीनगरात तब्बल २२४ तर मराठवाड्यात ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात
करण्यात आला. दरम्यान, पश्चिमी भागातून जायकवाडीत आलेल्या प्रचंड आवकमुळे जिल्ह्यात पाणीपुरवठा वाढला. परिणामी टँकरची मागणी घटली.
ऑगस्टच्या अहवालानास सार संभाजीनगरसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर ५ जिल्हे टँकरमुक्त झाले. विभागात केवळ जालना, बीड आणि धाराशिव मिळून १०७ टँकर सुरु होते. दरम्यान, १० ऑगस्टपर्यंत घट होऊन विभागातील टँकरसंख्या केवळ ९६ पर्यंत खाली आली. यावेळी जालन्यात २९, बिडमध्ये ५९ तर धाराशिवमध्ये ८ असे
४७७ विहिरी अधिग्रहित
44 आजघडीला विभागात एकूण १८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. या टँकरसाठी मराठवाड्यात ४७७विहीरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. जून, जुलैमध्ये कमी पाऊस झाल्याने जून आणि जुलैअखेरपर्यंत टँकरच्या संख्येत ४००हून अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. जुलै महिन्यातील शेवटचे चार ते पाच दिवस वगळले तर संपूर्ण महिना आणि ऑगस्ट महिन्यातील पंधरवड्यातील काही दिवस अशा एकूण २० ते २५ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने आता पून्हा ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
९६ टँकर सुरु होते. परंतु जायकवाडीतून विसर्ग बंद झाल्याने आणि मराठवाड्यात पाऊस रुसल्याने विभागात पुन्हा
एकदा टँकरसंख्येत वाढ झाली आहे. विभागीय आयुक्तालयातून प्राप्त अहवालानुसार आजघडीला संभाजीनगर जिल्ह्यात टँकर
जुलैमध्ये ४१३ टँकर होते सुरु
▶ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत ९२ गावे, ३६ वाड्यांना १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जून, जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त न झाल्याने विभागातील २४४ गावांसह ९६ वाड्यांना २१ शासकीय, ३९२ खासगी अशा एकूण ४१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही टँकर संख्या कमी होऊन चक्क ९६ वर आली होती. मात्र पावसाच्या अनुपस्थितीमुळे यात पून्हा वाढ झाली आहे.
टँकरची जिल्हानिहाय संख्या
▶ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६२ गावे, १७ वाड्यांना ९० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर जालन्यातील १६ गावे, १३ वाड्यांना २५ टँकरने, बीडमधील २० गावे, २५ वाड्यांना तब्बल ५४ टँकरने तर धाराशिव जिल्ह्यातील ७ गावांसाठी ९ टँकर अशा एकूण १०५ गावे, ५५ वाड्यांना मिळून १८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९० टँकरसह विभागात
१८१ पर्यंत टँकरसंख्येत वाढ झाली आहे.